दि. २८ एप्रिल २०१३ – चिपळूणच्या वैद्यकीय क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू झाला. लाईफकेअर हॉस्पिटलची स्थापना ही केवळ एका आधुनिक इमारतीची किंवा सुविधांची सुरुवात नव्हती, तर हा चिपळूणकरांच्या आरोग्यविश्वातील विश्वासाचा, सेवाभावाचा आणि नवचैतन्याचा जन्म होता. आज १२ वर्षांनंतर, लाईफकेअर हॉस्पिटल हे केवळ एक उपचार केंद्र न राहता, विश्वासार्हतेचे दुसरे नाव म्हणून ओळखले जाते.
स्थापनेमागील प्रेरणा आणि ध्येय
२००८ साली, चिपळूणमधील काही डॉक्टरांनी एकत्र येऊन बहुवैद्यकीय सुविधा असलेले हॉस्पिटल उभारण्याचा संकल्प केला. त्या काळात चिपळूणमध्ये केवळ काही ठराविक सर्जिकल, गायनॅकॉलॉजी, ईएनटी आणि नेत्ररोग हॉस्पिटल्स मर्यादित साधनसंपत्तीवर चालत होती. गंभीर रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या सुविधा नव्हत्या. गंभीर रुग्णांना पुढील उपचारांसाठी मोठ्या शहरांमध्ये पाठवताना त्यांचे आणि पर्यायाने नातेवाईकांचेही सर्व प्रकारे होणारे हाल डॉक्टर म्हणून पाहवत नव्हते. आणि त्यातूनच चार वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर, २८ एप्रिल २०१३ रोजी लाइफकेअर हॉस्पिटलने आपल्या सेवेला सुरुवात केली. या निर्णयामुळे चिपळूणच्या वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडली आणि चिपळूण व परिसरातील रुग्णांना कायमस्वरूपी उत्तम उपचार मिळण्याची शाश्वती मिळाली.
सर्वसमावेशक उपचार – सेवाभावाची मूर्ती
लाईफकेअर हॉस्पिटलच्या स्थापनेमागे ‘सर्वसमावेशक उपचार पद्धती’चा प्रामाणिक हेतू होता. संस्थापक डॉक्टरांनी त्यांच्या वैयक्तिक क्लिनिकच्या पलीकडे जाऊन, आधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले. चिपळूणमधील पहिले CT स्कॅन मशीन, सुसज्ज ICU, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, अशा अनेक महत्वाच्या सेवा सुविधा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मानकांनुसार (NABH) उपलब्ध करून दिल्यामुळे हॉस्पिटलने रुग्णसेवेत नवा मापदंड निर्माण केला.
वैद्यकीय प्रगतीतील मैलाचे टप्पे
सर्जरी आणि अत्याधुनिक उपचार:
लाईफकेअर हॉस्पिटलमध्ये चार अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्स असून, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मानकांनुसार (NABH) संसर्ग नियंत्रण नियम पाळले जातात. अनुभवी सर्जन्स आणि कुशल स्टाफमुळे अनेक अशक्य वाटणाऱ्या केसेस यशस्वीपणे हाताळल्या गेल्या आहेत. उदाहरणार्थ, केवळ ३०% ईजेक्शन फ्रॅक्शन असलेल्या हर्नियाच्या रुग्णावर शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे.
गंभीर रुग्णांसाठी ‘गोल्डन अवर’ उपचार:
हार्ट ऍटॅक, स्ट्रोकसारख्या गंभीर स्थितीत ‘गोल्डन अवर’मध्ये थ्रॉम्बोलायसिस उपचाराने अनेक रुग्णांचे प्राण वाचवले आहेत.
हृदयविकार, डायालिसिस व पेसमेकर:
अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, पेसमेकर बसवणे, आणि डायलिसिसवरील रुग्णांवर शस्त्रक्रिया – हे उपचार नियमितपणे उपलब्ध आहेत.
कर्करोग विभाग – विश्वासार्हतेचा मानदंड
लाईफकेअर हॉस्पिटलमधील कर्करोग विभाग हा कोकणातील एक अग्रगण्य केंद्र आहे. येथे MJPJAY (महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना) अंतर्गत हजारो रुग्णांवर केमोथेरपी, रेडिएशन आणि शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आधुनिक Sevoflurane भूल औषध, उत्तम ICU व्यवस्थापन आणि दर्जेदार अँटीबायोटिक्स यामुळे रुग्णांना सुरक्षित आणि प्रभावी उपचार मिळतात. रेडिएशनसाठी वापरले जाणारे लिनियर एक्सिलिरेटर मशीन हे कोकणातील सर्वोत्कृष्ट मानले जाते, ज्यामुळे शेकडो कर्करोग रुग्णांना नवजीवन मिळाले आहे.
नेत्ररोग विभाग – प्रकाशाचा दीप
दृष्टी हे आयुष्याचं सर्वात मोठं वरदान! लाईफकेअर हॉस्पिटलमध्ये मोफत मोतीबिंदू ऑपरेशन विविध योजनांअंतर्गत केले जातात. Phaco मशीनमुळे शस्त्रक्रियेनंतरचा परिणाम उत्कृष्ट मिळतो. डॉ. नदीम खातिब हे कोकणातील एकमेव कोर्निया ट्रान्सप्लांट करणारे नेत्र शल्यचिकित्सक असून, त्यांनी शेकडो लोकांना अंधारातून प्रकाशाकडे नेले आहे.
ओरल व मॅक्सिलोफेशिअल सर्जरी हा एक अपघातग्रस्त रुग्णांसाठी वरदान ठरणारा विभाग आपल्याकडे कार्यरत आहे. ज्यामुळे अपघातामुळे चेहऱ्याला व जबड्याला होणाऱ्या गंभीर दुखापतींच्या अतिशय कौशल्यपूर्ण शस्त्रक्रिया (कॉस्मॅटिक सर्जरी) केल्या जातात. ज्याचा आजपर्यंत अनेक रुग्णांना लाभ मिळाला आहे.
डायलेसिस व IVF – जीवनसंवर्धनाचा वारसा
६ बेड्सचे डायलिसिस युनिट उपलब्ध आहे. व डायलेसिस सुविधा महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत असून, दररोज गरजू रुग्णांना नवजीवन देत आहे. सामाजिक संस्थांच्या मदतीने गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य दिले जाते.
IVF विभाग - ग्रामीण व दुर्गम भागातील सुविधांच्या अभावामुळे उपचारासाठी महानगराकडे वळणाऱ्या दांपत्याला महागडे उपचार, अन्य अडचणीना तोंड देत अपेक्षित यश न मिळाल्याने नैराश्य येणे व उपचार अर्धवट सोडले जाणे या सर्व अडचणी लक्षात घेऊन चिपळूण मधील सुप्रसिद्ध कुशल अनुभवी वंध्यत्व व आय व्ही एफ तज्ञ डॉ. सायली माधव, डॉ. आशीर्वाद थत्ते व डॉ. विक्रमसिंह खोत यांनी एकत्रित येऊन कोकणातील ग्रामीण भागातील जोडप्यांना सवलतीच्या दरात वंध्यत्व निवारण निगडित आय यु आय, आय व्ही एफ, आय सी एस आय, डोनर सर्विसेस , गर्भ रोपण (एम्ब्रोईओ ट्रान्सफर), फ्रीजिंग अशा सर्व अत्याधुनिक तपासण्या व उपचार पद्धती देणारे सुसज्ज अत्याधुनिक असे ड्रीम्स आयव्हीएफ फर्टिलिटी आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर कार्यरत केले आहे. अनेक गुंतागुंतीच्या केसेस मध्ये टेस्ट ट्यूब बेबी उपचार पद्धतीने असंख्य जोडप्यांना पालकत्वाचा आनंद मिळवून देण्यात यश आले आहे.
आकडेवारीतून १२ वर्षांचा प्रवास
सेवा रुग्णसंख्या / केसेस (१२ वर्षे)
MJPJAY अंतर्गत शस्त्रक्रिया - १६७६
केमोथेरपी रुग्ण - ७०४४
रेडिएशन उपचार लाभलेले - १११८
डायलिसिस - १६०० सत्रे (२०० हुन अधिक रुग्ण )
मोफत मोतीबिंदू ऑपरेशन्स - ३८४७
अँजिओप्लास्टी - ६३५
पेसमेकर रुग्ण - २७
IVF यशस्वी गर्भधारणा – जवळपास १५०
(सर्व आकडेवारी हॉस्पिटलच्या उपलब्ध माहितीनुसार आहे)
रुग्णांचा अनुभव – विश्वासाचा प्रवास
लाईफकेअर हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना केवळ वैद्यकीय उपचारच नव्हे, तर मायेचा आणि विश्वासाचा अनुभव मिळतो. हॉस्पिटलमधील डॉक्टर्स, नर्सेस आणि स्टाफ रुग्णांना आपुलकीने वागवतात, त्यांच्या मानसिक आणि शारीरिक पुनर्वसनात सक्रिय सहभाग घेतात. हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या अनेक गंभीर रुग्णांनी नवजीवन मिळवल्याचा अनुभव सांगितला आहे.
तसेच अनावश्यक चाचण्या, तपासण्या आणि औषधोपचाराचा भार न देता खरोखर आवश्यक त्याच चाचण्या केल्या जातात व कमीतकमी खर्चात किंवा उपलब्ध योजनांअंतर्गत मोफत उपचार पुरविण्यासाठी, रुग्णांवर अनावश्यक खर्चाचा ताण येऊ नये याचीही लाईफकेअर हॉस्पिटलचे डॉक्टर्स कायम खबरदारी घेतात.
एक परिवार, एक ध्येय
१२ वर्षांच्या प्रवासात लाईफकेअर हॉस्पिटल हे केवळ वैद्यकीय संस्था न राहता, एक परिवार बनले आहे – रुग्ण, डॉक्टर्स, नर्सेस, स्टाफ आणि समाजाचा. येथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला सुसंवाद, सहकार्य आणि संपूर्ण उपचार पद्धती यांचा अनुभव मिळतो.
भविष्यातील वाटचाल
अनुभव, नवकल्पना आणि अविरत सेवा यांच्या संगमातून लाइफकेअर हॉस्पिटलने चिपळूणच्या आरोग्यविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. पुढील काळातही ही सेवा अधिक व्यापक व्हावी, अधिक तंत्रज्ञानयुक्त आणि सर्वसमावेशक व्हावी, अशी अपेक्षा आहे.
लाईफकेअर हॉस्पिटल – आरोग्याचा नवा विश्वास!
१२ वर्षांचा हा प्रवास हा केवळ आकडेवारीचा किंवा यशाचा नाही, तर ‘माणुसकी’च्या, सेवाभावाच्या आणि नव्या विश्वासाच्या पायावर उभा आहे. लाईफकेअर हॉस्पिटलने चिपळूणकरांना केवळ आरोग्य नव्हे, तर नवजीवन दिले आहे – आणि हा प्रवास अजूनही अविरत सुरूच आहे