लाईफकेअर हॉस्पिटल - औद्योगिक वैद्यकीय परिषदेत नामांकित कंपन्याचा सहभाग' लाईफकेअर हॉस्पिटल, चिपळूण येथे इंडस्ट्रियल मेडिकल कॉन्फरन्स संपन्न लाईफकेअर हॉस्पिटल, चिपळूण येथे दि. २९/०३/२०२२ रोजी इंडस्ट्रियल मेडिकल कॉन्फरन्स घेण्यात आली. लाईफकेअर हॉस्पिटल हे चिपळूण मधील एकमेव NABH प्रमाणित १०२ बेड्सचे मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून ओळखले जाते. परंतु लाईफकेअर हॉस्पिटल हे इतर सर्व रुग्नांइतकेच औद्योगिक क्षेत्रातील आवश्यक वैद्यकीय सेवा सुविधा देण्याकरिताही पूर्णपणे सुसज्ज आहे. कोणत्याही प्रकारच्या औदयोगिक वैद्यकीय आपत्तींसाठी २४ तास सज्ज आहे. अशा प्रकारची सुविधा आपल्याच शहरात उपलब्ध आहे याची सखोल माहिती चिपळूणनजीकच्या सर्व औद्योगिक कंपन्यांना देणे व हि सुविधा प्रत्यक्ष दाखविणे हा या कॉन्फरन्सच्या मुख्य उद्देश होता. सदर कॉन्फरन्सला सन्माननीय अतिथी म्हणून डायरेक्टरेट ऑफ इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थ, कोल्हापूर चे जॉईंट डायरेक्टर - श्री. सुनील जोशी व रत्नागिरी चे डेप्युटी डायरेक्टर श्री. पी. आर. भिंताडे यांची खास उपस्थिती लाभली. कार्यक्रमादरम्यान लाईफकेअर हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. इसहाक खतीब यांनी हॉस्पिटलच्या स्थापनेपासून आत्तापर्यंतच्या वाटचालीचा व प्रगतीचा आलेख सर्वांसमोर मांडला. उपलब्ध सेवा सुविधा, सर्व स्तरातील लोकांना उपचार घेता यावेत याकरिता हॉस्पिटल सातत्याने करत असलेले प्रयत्न व औद्योगिक क्षेत्राकरीत उपलब्ध सेवा याचा तपशीलवार आढावा घेतला. श्री सुनील जोशी व श्री. पी. आर. भिंताडे यांनी हॉस्पिटलच्या सर्व विभागांना भेट देऊन तपशीलवार माहिती घेतली. आपले मनोगत व्यक्त करताना हॉस्पिटलच्या कामाचे मनापासून कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. तसेच औद्योगिक क्षेत्रातील विविध उपक्रमांसाठी आम्ही नेहमीच लाईफकेअर हॉस्पिटलला सहकार्य करू असे आश्वासनही दिले. लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशन - MARG चे - श्री. हेमंत डांगे यांनीही अशा प्रकारची उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत डॉ. खतीब आणि टीमची प्रशंसा केली. तसेच औद्योगिक प्रथमोपचार प्रशिक्षण वगैरे विविध वैद्यकीय उपक्रमांसाठी एक चांगले व्यासपीठही उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले. तसेच औद्योगिक वैद्यकीय सेवेचा प्रदीर्घ अनुभव असणारे डॉक्टर मिलिंद गोखले यांनी वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये एका चांगल्या हॉस्पिटलच्या आधाराची भासणारी गरज व त्यादृष्टीने असणारे लाईफकेअरचे महत्व स्पष्ट केले.
Lifecare Hospital - Free Services Article in Prahar Newspaper
Lifecare Hospital - Free Services Article Published in Lokmat Newspaper
NABH Certificate
MJPJAY Best performance Award 2020
MJPJAY Best performance Award 2021